RBI कडून सेव्हिंग अकाऊंट्सवर मोठा निर्णय : झिरो बॅलन्स खाते, मोफत डिजिटल व्यवहार आणि बँकिंग चार्जेसमध्ये मोठे बदल
देशातील सर्वसामान्य बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सेव्हिंग अकाऊंटसंबंधी मोठे बदल जाहीर केले असून Basic Savings Bank Deposit Account (BSBD) किंवा बेसिक सेव्हिंग्ज खाते आता अधिक सुलभ, स्वस्त आणि ग्राहक-अनुकूल बनणार आहे. या खात्यांवरील मिनिमम बॅलन्सची सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली असून, अनेक सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.
काय बदल झाले.?
RBI च्या नव्या नियमांनुसार BSBD खाते आता ‘सामान्य बँकिंग सेवा’ म्हणून गणले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती पूर्णपणे झिरो बॅलन्सवर हे खाते उघडू शकते. बँकेने किमान सरासरी शिल्लक (Minimum Average Balance – MAB) ठेवण्याची अट लावू नये, तसेच खाते शून्यावर गेल्यास दंड आकारण्यात येणार नाही.
मोफत मिळणाऱ्या सुविधा
RBI ने BSBD खाते अत्यंत सोपे आणि शून्य-खर्चाचे बनवण्यासाठी खालील सुविधा पूर्णपणे मोफत केल्या आहेत:
१) डेबिट कार्ड – पूर्णपणे मोफत
ATM/डेबिट कार्डचे कोणतेही वार्षिक शुल्क नाही.
ग्राहकांनी मागणी केल्यासच कार्ड दिले जाईल.
२) चेकबुक – मोफत
वर्षाला किमान २५ चेक पाने पूर्णपणे विनाशुल्क.
३) डिजिटल बँकिंग – पूर्णतः मोफत
UPI, NEFT, RTGS, IMPS, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग — या सर्व सुविधा कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध राहतील.
४) ATM/शाखा व्यवहारांची मर्यादा
महिन्याला ४ मोफत पैसे काढणे (ATM किंवा शाखेतून).
त्यानंतर बँकेचे नियमित शुल्क लागू होईल.
मात्र UPI आणि इतर डिजिटल व्यवहार या मर्यादेत मोजले जाणार नाहीत — कितीही केले तरी मोफत.
५) हिडन चार्जेसला पूर्णविराम
बँका कोणतेही लपविलेले शुल्क (hidden charges) लावू शकत नाहीत.
जुने सेव्हिंग अकाऊंट BSBD मध्ये कसे बदलणार.?
आपले सध्याचे सामान्य Savings Account तुम्ही ७ दिवसांत मोफत BSBD खात्यात बदलू शकता.
बँकांना हा बदल बांधीलकीने व वेळेत करावा लागेल.
जुने BSBD खाते असेल तर नवीन सर्व सुविधा तात्काळ लागू होतील.
एका व्यक्तीला फक्त एकच BSBD खाते ठेवण्याची परवानगी.
खाते उघडण्यासाठी अटी
शून्य रुपये इनिशियल डिपॉझिट — एक पैसादेखील लागत नाही.
पूर्ण KYC आवश्यक.
खाते उघडताना स्वयं-घोषणापत्र (self-declaration) द्यावे लागेल.
सर्वांसाठी समान खाते — गरिब ते श्रीमंत
RBI च्या निर्णयामुळे BSBD खाते हे आता सर्वात स्वस्त, सोपं आणि ग्राहक-अनुकूल झिरो-बॅलन्स खाते ठरत आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी तर हे अधिक फायदेशीर, पण कोणतीही व्यक्ती—उत्पन्न, व्यवसाय किंवा वर्ग कोणताही असो—हे खाते उघडू शकते.
नवीन नियम कधी लागू.?
RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होत आहेत आणि सर्व बँकांना त्याचे पालन अनिवार्य आहे.
ग्राहकांसाठी फायदा
बँकिंग खर्चात मोठी कपात.सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकताडिजिटल व्यवहारांना चालना खाते शून्यावर गेले तरी चिंता नाही.
ग्रामीण, शहरी आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर ग्राहकांसाठी मोठा दिलासा
