लोण पिराचे विकासो चेअरमन पदि सरस्वताबाई पाटील तर व्हाईस चेअरमन पदि सुरेश( फौजी ) खैरनार यांची बिनविरोध निवड.
भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील लोण पिराचे येथील न्यु लोण पिराचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि सरस्वताबाई ओंकार पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदि सुरेश ( फौजी ) बुधा खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमनाथ पाटील यांनी चेअरमन पदाचा तर विठ्ठल पाटील यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा ठरल्याप्रमाणे दिल्याने या रिक्त जागांसाठी ही निवड घेण्यात आली. ही निवडीची सभा दि. २८ रोजी सकाळी घेण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी अविनाश पाटील , प्रेमसिंग पाटील यांनी कामकाज पाहीले. त्यांना संस्थेचे सचीव संजय पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचीत पदाधिकार्यांसह अविनाश पाटील यांचाही संचालक मंडळामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक सोमनाथ पाटील, विठ्ठल पाटील, भिमराव पाटील, रायचंद परदेशी, प्रभाकर पाटील, वसंत पाटील, पंढरीनाथ पाटील, भाऊसाहेब पाटील, दिपक पाटील, प्रदिप पाटील, सुरेश खैरनार,अरुणा पाटील आदि संचालक तसेच प्रा. चंद्रशेखर पाटील, दिपक पाटील, कल्याणराव पाटील, सरदार परदेशी घुसर्डी खुर्द, विजय पाटील लोण पिराचे , सुरेश पाटील, रमेश पाटील, सतीलाल पाटील बोदर्डे, संस्थेचे लिपीक परशराम पाटील यांचेसह नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन रमेश पाटील यांनी केले.तसेच नवनिर्वाचीत चेअरमन सरस्वताबाई पाटील, व्हाईस चेअरमन सुरेश खैरनार फौजी यांचा सत्कार पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी शाल, पुष्पहार देऊन केला.
