भडगाव वार्ताहर —
तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात दि. २२ रोजी सकाळी ९ वाजता विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीस भारताचे माजी राष्टृपती मिसाईलमॅन, वैज्ञानिक डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते
पुजन करुन पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन गोंडगाव येथील लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. याप्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे,पालक सभेचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जि. प. प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल सोनार, माजी अध्यक्ष ललीत मांडोळे तसेच विदयालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव, विदयार्थी, विदयार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक सी. एस. सोन्नीस , सांस्कृतीक प्रमुख पी. व्हि. सोळंके आदिंनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.या विज्ञान प्रदर्शनात विदयार्थ्यांनी विविध माॅडेल तयार करुन मांडले. तसेच माॅडेल विषयी सविस्तर माहिती दिली.या प्रदर्शनात एकुण ३६ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विदयार्थ्यांमधुन १ ते ३ क्रमांक निवड करण्यात आली. परीक्षक म्हणुन एस. आर. पाटील, आर. एस. सैंदाणे यांनी कामकाज पाहीले. यावेळी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमासाठी संपुर्ण स्टाॅफचे अनमोल सहकार्य लाभले.
