भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून A.C आरक्षित जागेसाठी अपक्ष उमेदवार अविनाश अहिरे यांनी प्रचाराचा दमदार नारळ फोडला असून जनतेत वाढणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत त्यांची दखल घेणे आवश्यक ठरत आहे.
प्रभागातील विविध वसाहती, गल्ली–बोळांमध्ये भेटी देत असताना नागरिक मोठ्या संख्येने अविनाश अहिरे यांना साथ देत आहेत. “विकास आणि पारदर्शक जनसेवा” हा घोषवाक्य ठेवत अहिरे यांनी मतदारांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता तसेच युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्रीडा व शिक्षण सुविधा निर्माण करण्याचे नियोजन त्यांनी मांडले आहे.
नागरिकांमध्येही चांगले समाधान दिसून येत असून सार्वजनिक चर्चेत “यावेळी पारदर्शक, स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या उमेदवाराला संधी द्यायची” अशी भावना निर्माण होत असल्याचे दिसते. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण वोटर्सकडून अहिरे यांना अपेक्षित पाठिंबा मिळत असल्याचे चित्र प्रचार दौऱ्यांदरम्यान दिसत आहे.
अविनाश अहिरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“मी नेहमी सर्व सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असेन. निवडणूक ही केवळ पदासाठी नव्हे तर लोकसेवा व प्रभागाच्या विकासासाठी आहे. जनतेचा विश्वास टिकवून त्यांच्या आशा-अपेक्षित दिशेने काम करणे हेच माझे ध्येय आहे.”प्रभाग क्रमांक ११ मध्ये निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून अपक्ष उमेदवार अविनाश अहिरे यांच्या सततच्या संपर्क व जनाधारामुळे निवडणुकीत त्यांचा प्रभाव ठळकपणे उमटत आहे.
जनतेकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता अहिरे यांच्या विजयाची शक्यता अधिक दृढ होत असल्याचे राजकीय पंडितांचे मत आहे.
