भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील पिंपरखेड येथे आज सकाळी तलावाच्या पाण्यात अजून एक मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच तलावात दोन दिवसांपूर्वी दि.१४ रोजी वाल्मीक संजय ह्याळींगे या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुन्हा आज दुसरा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसापुर्वी तालुक्यातील पिपंरखेड येथील वाल्मीक संजय ह्याळींगे या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आला होता. याबाबत भडगांव पोलिसात अक्समात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली होती त्याबाबतचा पोलिस तपास सुरु असतांनाच आज सकाळी ७:०० वाजता पुन्हा दोन दिवसांनी त्याच तलावाच्या पाण्यात नारायण रामदास ऱ्हाळीगे वय- ५२ वर्ष या इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली असुन मृताच्या नातेवाइकांनी आक्रोश करीत मयताचा घातपात झाल्याचा सशंय व्यक्त करीत मारेकऱ्याना तात्काळ अटक करावी व इनकॅमेरा शव विच्छेदन करावे या मागणीसाठी कासोदा-भडगांव महामार्गावर तब्बल तीन रास्ता रोको आंदोलन करीत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांन कडुन घेण्यात आला त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली असून पोलिस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगांव, उपविभागीय पोलिस अधिकारी बापु रोहम पाचोरा,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड,भडगांव पोलिस निरीक्षक महेश शर्मा,पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे,पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी करनकाळ,पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांनी धाव घेत नातेवाईकांनची समजुत काढत कारवाईचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
दोघही मयतांचा घातपात झाल्याचा सशंय.?
एकामाघो माग लगेच दोन दिवसांनी त्याच पाण्याच्या तलावात दुसराही मृतदेह आढळुन आल्याने दोघही मयतांचा घात पात झाल्याचा सशंय नागरीकांन सह नातेवाईकांन मध्ये चर्चचा विषय बनला आहे याबाबत पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे
या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तो पर्यंत भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
