भडगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ नामनिर्देशनाचा सहावा दिवस उत्साहात पार.!!!
भडगाव प्रतिनिधी :–
आगामी भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन दाखल करण्याचा आज सहावा दिवस असून, आज दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी नगराध्यक्षा आणि नगरसेवक पदाकरिता मिळालेल्या अर्जांची निवडणूक विभागाने माहिती जाहीर केली.
नगराध्यक्षा पदासाठी दोन अर्ज दाखल
आजच्या सहाव्या दिवशी नगराध्यक्षा पदासाठी एकूण २ अर्ज दाखल झाले असून उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत:
1. मालचे रेखा प्रदीप (शिवसेना)
2. मालचे लताबाई अजय (अपक्ष)
यामुळे नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत थेट दोन उमेदवारांमध्ये रंगतदार सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरसेवक पदासाठी आज ११ नामनिर्देशन अर्ज दाखल
आज विविध प्रभागांतून नगरसेवक पदाकरिता एकूण ११ अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये शिवसेना, भाजपा तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश असून आज दाखल झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे—
प्रभाग १-अ: मालचे लताबाई अजय (भाजपा)
प्रभाग १-ब: नरवाडे गणेश काशीनाथ (शिवसेना)
प्रभाग ६-ब: पाटील लखीचंद प्रकाश (शिवसेना)
प्रभाग ७-अ: परदेशी नीता गणेश (शिवसेना)
प्रभाग ७-ब: शेख खलील शेख अजीज (शिवसेना)
प्रभाग ८-अ: पाटील समीक्षा लखचंद (शिवसेना)
प्रभाग १०-अ: पाटील विठ्ठल कौतिक (भाजपा)
प्रभाग १०-अ: पाटील जितेंद्र शांताराम (शिवसेना)
प्रभाग १०-ब: पाटील ज्योति जितेंद्र (शिवसेना)
प्रभाग ११-अ: अहिरे देवाजी बापू (शिवसेना)
प्रभाग ११-ब: भोई कल्पनाबाई जगन (शिवसेना)
एकूण अर्जांची संख्या वाढली
कालपर्यंत दाखल झालेल्या अर्जांसह आजपर्यंत एकूण आकडे पुढीलप्रमाणे—
नगराध्यक्षा पदाकरिता उमेदवार: २
नगराध्यक्षा पदाकरिता अर्ज: २
नगरसेवक पदाकरिता उमेदवार: १८
नगरसेवक पदाकरिता अर्ज: १९
नगरसेवक पदासाठी उमेदवारांची संख्या वाढत असून शिवसेना आणि भाजपामध्ये प्रभागनिहाय चुरस वाढताना दिसत आहे. नामनिर्देशन सादर करण्याचा कालावधी संपेपर्यंत अजून काही महत्त्वाचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.







