मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर — महिलांसाठी ११४ वॉर्ड राखीव.!!!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. सकाळी ११ वाजता मुंबई महानगरपालिकेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर, बांद्रा येथे या प्रक्रियेला सुरुवात झाली. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत काढण्यात आली.
त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जातींसाठी एकूण १५ वॉर्ड राखीव असून, त्यापैकी ८ वॉर्ड अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातींसाठी २ वॉर्ड राखीव असून, त्यापैकी १ ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गासाठी ६१ वॉर्ड राखीव असून, त्यापैकी ३१ वॉर्ड महिला ओबीसी उमेदवारांसाठी असतील. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी १६१ वॉर्ड राखीव असून, त्यामध्ये ३१ सर्वसाधारण महिला उमेदवारांचा समावेश असेल. सर्वसाधारण प्रवर्गातील १४९ वॉर्डांपैकी ७४ वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. दिनांक १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षणाच्या प्रारूपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जमातींसाठी राखीव प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१ आहेत. अनुसूचित जातींसाठी राखीव १५ वॉर्ड अनुक्रमे २६, ९३, १५१, १८६, १४६, १५२, १५५, १४७, १८९, ११८, १८३, २१५, १४१, १३३ आणि १४० असून, त्यापैकी महिलांसाठी राखीव वॉर्ड आहेत – १३३, १८३, १४७, १८६, १५५, ११८, १५१ आणि १८९.
ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ६१ वॉर्ड क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – ७२, ४६, २१६, ३२, ८२, ८५, ४९, १७०, १९, ९१, ६, ६९, १७६, १०, १९८, १९१, १०८, २१९, १२९, ११७, १७१, ११३, ७०, १०५, १२, १९५, ५०, १३७, १, २२६, १३६, ४, १८२, ९५, २२२, ३३, १३८, २७, ४५, १८७, ८०, २२३ आणि १५०. त्यापैकी ओबीसी महिला राखीव वॉर्ड आहेत – ५२, ४६, १५८, १५०, ३३, ६, १२, १६७, ११७, १०८, १२८, ८०, १००, १९, ८२, ४९, ११, १७६, २१६, १९१, १७०, १३, १०५, १९८, ७२, १५३, १२९, १८, १, ३२ आणि २७.
खुल्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव वॉर्ड क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – २, ८, १४, १५, १६, १७, २४, २८, ३१, ३७, ३८, ३९, ४२, ४४, ५१, ५६, ६१, ६४, ६६, ७१, ७३, ७४, ७७, ७८, ७९, ८१, ८३, ८४, ८८, ९४, ९६, ९७, १०१, १०३, ११०, ११२, ११४, ११५, ११६, १२४, १२६, १२७, १३१, १३२, १३४, १३९, १४२, १४३, १५६, १५७, १६३, १७२, १७३, १७४, १७५, १७७, १७९, १८०, १८४, १९६, १९७, १९९, २०१, २०३, २०५, २०९, २१२, २१३, २१८, २२०, २२४ आणि २२७.
वरीलप्रमाणे आरक्षण सोडतीनुसार महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून, यानंतर हरकती व सूचनांच्या प्रक्रियेअंती अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.