भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ : दुसऱ्या दिवशी अर्जविहीन स्थिती.!!!

0 229

भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ : दुसऱ्या दिवशी अर्जविहीन स्थिती.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दुसरा दिवस संपन्न झाला. मात्र, दिवसभरात नगराध्यक्षा तसेच नगरसेवक पदासाठी एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.

निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्यासाठी आवश्यक सुविधा व कागदपत्र तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही, दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नगराध्यक्षा पदासाठी प्राप्त अर्ज : ०

नगरसेवक पदासाठी प्राप्त अर्ज : ०

दरम्यान, येत्या काही दिवसांत विविध पक्ष व अपक्ष उमेदवार आपापली रणनीती आखत असून, पुढील दिवसांत अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत निश्चित तारखेपर्यंत सुरु राहणार आहे.

भडगाव नगरपरिषदेतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पहिल्याच दिवशी अर्ज न मिळाल्यामुळे स्पर्धेचे चित्र अजूनही धूसर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!