शिवसेना (शिंदे गट) तर्फे मा. नगरसेविका सौ. समीक्षा लखीचंद पाटील पुन्हा रिंगणात.!!!
प्रभाग क्रमांक ८ मध्ये विकास व जनसंपर्काचा दम – मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, विविध प्रभागांमधून उमेदवारांची चाचपणी, प्रचाराची तयारी वेग घेत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे विद्यमान नगरसेविका मा. सौ. समीक्षा लखीचंद पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
कार्यकाळात विकासकामांचा ठसा उमटवणाऱ्या समीक्षा पाटील या प्रभागातील लोकप्रिय नगरसेविका मानल्या जातात. त्यांनी रस्ते काँक्रीटीकरण, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्वच्छता उपक्रम, जलनिकासी नाले बांधकाम, तसेच महिलांच्या बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनासाठी केलेले प्रयत्न यामुळे मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव वाढला आहे.
भडगाव शहरात महिला नेत्या म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागरिकांशी सतत संपर्क ठेवून, छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेतात. प्रभागातील सर्वच समाजघटकांशी त्यांनी दृढ संबंध राखले असून, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.
समीक्षा पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह निर्माण झाला आहे. “शहरात विकास करायचा असेल तर समीक्षा ताईंसारख्या कर्मयोगी लोकप्रतिनिधीची गरज आहे,” असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
दरम्यान, त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा शिवसेना (शिंदे गट) तर्फे येत्या काही दिवसांत होणार असून, प्रचाराचा शुभारंभ भव्य जनसंपर्क यात्रेने करण्यात येणार आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने तयारीला लागले आहेत.