वडाळे वडाळी विकासोचे नवनिर्वाचीत चेअरमन धर्मराज अहिरराव यांचा सत्कार पञकार अशोक परदेशी यांनी केला.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वडाळे वडाळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी धर्मराज नगराज अहिरराव (माजी सरपंच) तर व्हाईस चेअरमन पदि जगन्नाथ पुंडलिक शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेअरमन पदाचा शिवाजी आमले तर व्हाईस चेअरमन पदाचा समाधान आमले या दोघांनी ठरल्याप्रमाणे पदाचे राजीनामे दिल्याने या रिक्त जागांसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. ही निवडणुक दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता निवडणुक निर्णय अधिकारी प्रणिता भोयर सहकार अधिकारी चाळीसगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना संस्थेचे सचिव अरुण राजपुत यांनी याकामी सहकार्य केले. याप्रसंगी संचालक मंडळामार्फत नवनिर्वाचीत दोघा पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक शिवाजी विक्रम आमले, अजित अहिरराव, सुभाष अहिरराव, समाधान आमले, भोजराज आमले, शुभांगी पाटील, सीमाबाई आमले, मंजुळाबाई आमले, अर्जुन सूर्यवंशी, रामदास बिराडे ,सुखदेव आमले आदि सर्व संचालक व ग्रामस्थ, शेतकरी, सभासद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील निलेश अहिरराव तसेच बापु आमले, एकनाथ आमले, राजू आमले, शरद सूर्यवंशी, शरद अहिराव, तुषार अहिरराव, संदीप आमले, बाबाजी सुर्यवंशी , रवींद्र सुर्यवंशी, विकास पाटील आदि नागरीक उपस्थित होते. तसेच आभार संस्थेचे सचिव अरुण राजपूत यांनी मानले. संस्थेच्या कर्मचार्यांनी याकामी परीश्रम घेतले.
विकासोच्या चेअरमन पदी वडाळा गाव चे माजी सरपंच धर्मराज नगराज अहिरराव यांची निवड झाल्याबद्दल भडगावचे लोकमत पत्रकार अशोक परदेशी, मळगावचे शैलेश भाऊराव मोरे, दशरथ दिनकर सोनवणे रवींद्र हिम्मत मोरे , रामदास नारायण मोरे , ज्ञानेश्वर दशरथ सोनवणे आदि मिञ परीवारामार्फत मळगाव गावी त्यांचा सत्कार केला. व निवडीबद्दल सर्व मिञ परीवारामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.