एक शाम किशोर अप्पा के नाम पाचोर्‍यात शायरीचा सोहळा उत्साहात संपन्न.!!!

देशभरातील प्रख्यात शायरांचा सहभाग साहित्य-संस्कृतीचा मेळा रंगला

0 647

एक शाम किशोर अप्पा के नाम पाचोर्‍यात शायरीचा सोहळा उत्साहात संपन्न.!!!

देशभरातील प्रख्यात शायरांचा सहभाग साहित्य-संस्कृतीचा मेळा रंगला

पाचोरा प्रतिनिधी :-

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “एक शाम किशोर अप्पा के नाम” हा अखिल भारतीय मुशायरा गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पाचोरा येथील आठवडे बाजार मैदानावर भव्यदिव्य वातावरणात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महापौर श्री. संजय गोहिल यांनी भूषविले, तर मुख्य पाहुणे म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील (भडगाव–पाचोरा मतदारसंघ) उपस्थित होते.

देशभरातील नामांकित शायर आणि कवयित्रींनी आपल्या सुरेल आवाजात आणि शब्दांच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शायरांच्या फेहरिस्तीत हामिद भुसावली, अल्ताफ ज़िया, तबरेज़ राणा, निकहत अमरोहवी, हिमांशी बाबरा, इमरान रशीद, इब्राहीम सागर, पप्लू लखनऊ, मुजावर मेलेगाव, जुबेर अली ताबीश आणि निजमा जमील साही यांसारख्या नामवंत कलावंतांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे आयोजन हाजी अबुलेस शेख अलाउद्दीन, मोहसिन खान सर आणि अकरम कुरेशी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले होते. स्थानिक साहित्यप्रेमी, युवक संघटना आणि सांस्कृतिक मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मुशायर्‍याचे उद्दिष्ट साहित्य, संस्कृती आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश पोहोचवणे हे असून आयोजकांच्या म्हणण्यानुसार — “शब्दांच्या माधुर्यातून प्रेम आणि एकतेचा सुगंध दरवळवणे” हेच या सोहळ्याचे खरे ध्येय आहे.

पाचोरा शहरात अशा दर्जेदार शायरी संमेलनाचे हे पहिलेच आयोजन झाल्याने साहित्यप्रेमी व रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!