भडगाव तालुक्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहीलेल्या ‘वंदे मातरम’ या गीतास दि. ७ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्त भडगाव तालुक्यात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय पाचोरा रोड भडगाव या ठिकाणी सकाळी कार्यक्रम सुरू झाला.
या कार्यक्रमात सुरवातीस मान्यवारांचे स्वागत, पोलीस निरीक्षक महेश शर्मा प्राचार्य,गायकवाड एन.एन. तसेच स्थानिक प्राचार्य यु.टी.ठाकुर , प्रमुख वक्ते डॉ. निलेश पाटील व ईतर मान्यवरांचे हस्ते दिपप्रजल्वन करुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.प्रस्तावना व सुत्र संचलन डॉ.प्रा.दिनेश तांदळे यांनी केली. सकाळी ९.५० मीनीटांनी संपूर्ण वंदे मातरम गीताचे (सहा कडवे असलेले) समुह गायन करण्यात आले. नंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव यांचे प्रशिक्षणार्थ्यांने वंदेमातरम या गीतावर व स्वतंत्रपुर्वी झालेल्या देशातील क्रांतीकारक उलाढालीवर आधारीत लघू पथनाटय सादर करण्यात आले. नंतर आपला भारतदेश विवीध परंपरेने नटलेला असल्याने पारंपारीक वेशभुषांवर आधारीत पोशाखात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव यांचे प्रशिक्षणार्थ्यी व आदर्श कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.डॉ. वाल्मीक आहीरे साहित्यीक यांना खानदेशी भाषेत देशभक्तीपर कवीता सादर करण्यात आली.
त्या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. निलेश पाटील, यांनी देशभक्ती वर क्रांतीवीर यांचे बलीदान व चळवळीवर उत्तम भाषण करुन सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उपस्थिती सर्व मान्यवरांचे प्रशांत एस. जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पञकार अशोक परदेशी, पत्रकार आर.बी.पाटील, प्रा.सी.व्हि.बीऱ्हाडे, आर.जे. कसोदे, गोपाळ पाटील, हेमंत खैरनार, डॉ.साहेबराव अहीरे, वैशाली पाटील, संगीता जाधव,निवाशी नायब तहसिलदार सुधीर सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुशिल सोनवणे, डॉ. डी.एम.मराठे, ह.भ.प.शाम महाराज, विजय देशपांडे, अशोक तायडे, अरुण चौधरी, डॉ.एस.एन.हडोलीकर, गजानन चौधरी, एच.डी. पाटील, डॉ. सीमा सौंदाने व शासकीय औ.प्र.संस्था येथील पगारे, दिनेश पाटील ,व्हि.एस.पाटील , अमन मते, राहुल मोरे , दिपक वनवे, गीरीष कोळंबे तसेच राजेंद्र पाटील , सुमनताई गिरधर पाटील माध्यमीक महाविद्यालय भडगाव यांचे विद्यार्थी व आदर्श कन्या महाविद्यालय यांचे विद्यार्थी तसेच खाजगी औ.प्र.संस्थेचे व शासकीय औ.प्र.संस्थेचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. एकुण १२३० विद्यार्थी व ७३ मान्यवरांच्या उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला.