नगरदेवळा येथील मुस्लिम कार्यकर्त्यांकडून आमदार किशोर आप्पा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.!!!
नगरदेवळा ता.पाचोरा
भडगाव–पाचोरा मतदारसंघाचे जनतेचे लाडके आणि विकासाभिमुख आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरदेवळा परिसरातील मुस्लिम बांधव आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात वाढदिवस साजरा करून आप्पांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
या प्रसंगी नगरदेवळा येथील अनु मेंबर जिभू दादा यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नेहमी सर्व समाज घटकांना सोबत घेत विकासाच्या वाटचालीत पुढाकार घेतला आहे. त्यांचा साधेपणा, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक विचारसरणीमुळेच मतदारसंघात त्यांच्याबद्दल अपार आदर आहे.”
कार्यक्रमास पाचोरा येथील नामांकित उद्योजक हाजी अबुलेस अलाउद्दीन शेख, डॉ. आलम देशमुख, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व उपस्थितांनी एकमुखाने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील विकासकामांना अधिक गती मिळावी, तसेच त्यांनी आरोग्यदायी व यशस्वी आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि विकासाच्या विचारांची देवाणघेवाण झाली. या वेळी नगरदेवळा ग्रामपंचायत चे सरपंच किरण काटकर अनु मेंबर, जिब्बू दादा, जावेद शेख सर,करीम शाह, समीर सैय्यद, अफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते