भडगावमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम.!!!
“स्व. बापुजी फाउंडेशनच्या वतीने खेळा व जिंका” उपक्रमात लाखोंची बक्षिसे; अभिनेत्री व बालगायिकांची धमाल सादरीकरणे
भडगावमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम.!!!
“स्व. बापुजी फाउंडेशनच्या वतीने खेळा व जिंका” उपक्रमात लाखोंची बक्षिसे; अभिनेत्री व बालगायिकांची धमाल सादरीकरणे
भडगाव प्रतिनिधी :-
दिनांक ३ नोव्हेंबर रोजी,कार्यसम्राट आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव शहरात लाडक्या बहिणींसाठी “स्व. बापुजी फाउंडेशनच्या वतीने खेळा व जिंका” हा भव्य मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, पारोळा रोडवरील आकाश मॉलच्या मागील मैदानावर रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर आणि सुप्रसिद्ध बालगायिका, “टिन्ही स्टार” महाडी मळेगांवकर यांचे विशेष सादरीकरण. उपस्थित बहिणींसाठी “पैठणीचा मिटर खेळ” आणि प्रेक्षकांसाठी लाखोंच्या बक्षिसांचा “खेळा व जिंका” उपक्रम या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन स्व. बापुजी युवा फाउंडेशन, भडगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, शिवसेना – युवासेना या दोन्ही संघटनांचा सक्रिय सहभाग आहे.
या उपक्रमाचे मुख्य प्रेरणास्थान म्हणून शिवसेनेच्या भडगाव नगरीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ. रेखा प्रदीप (जहांगीर) मालचे,आणि मा. नगरसेविका सौ. समिक्षा लखीचंद (उपाध्यक्षा, स्व. बापुजी युवा फाउंडेशन) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भडगाव शहरातील नागरिकांना आणि विशेषतः बहिणींना एकत्र आणून मनोरंजनासोबतच सामाजिक ऐक्य वाढविणे हे आहे. “लोकांच्या प्रेमाशिवाय विकास शक्य नाही. म्हणूनच आनंदाचे क्षण जनतेसोबत वाटणे हेच आमचे ध्येय आहे,” असे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांसाठी विशेष आसनव्यवस्था, पार्किंग, तसेच आकर्षक लकी ड्रॉ व भेटवस्तूंची सोय करण्यात आली आहे. “स्व. बापुजी युवा फाउंडेशन”च्या या उपक्रमाने शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.