गिरड येथील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा युद्धपातळीवर तपास लावा : अखिल मराठा दामिनी महिलांचे साकडे.!!!
गिरड येथील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा युद्धपातळीवर तपास लावा : अखिल मराठा दामिनी महिलांचे साकडे.!!!
भडगांव प्रतिनिधी : –
तालुक्यातील गिरड येथून तीन अल्पवयीन मुली दि. १९ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून बेपत्ता आहेत. त्यांचे रहस्यमयरित्या अपहरण झाले आहे. त्यांचा अद्याप तपास लागला नाही. घटनेमुळे नागरिक व मुली तसेच महिला वर्गात अत्यंत भिती व चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.
मुलींची आई ज्योती संजय कोळी यांचे फिर्यादीवरून जयश्री कोळी, जयलक्ष्मी कोळी व अश्विनी सोनवणे गेल्या पंधरा दिवसापासून बेपत्ता आहेत. आपल्या स्तरावरून तात्काळ युद्धपातळीवर तपास व्हावा. आणि सदर मुलींना पालकांच्या स्वाधीन करा.
तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा घटना वारंवार घडतात यास वेळीच पायबंद घातला जाईल असा पद्धतीची कडक कारवाई व्हावी. सदर बाबतीत नागरिकांनीही सतर्क राहत पोलिस विभागास माहिती मिळताच सहकार्य करा. असे आवाहन अखिल मराठा दामिनी पदाधिकारी मा. नगरसेविका योजना पाटील, सरला पाटील, डॉ. सुनिता मांडोळे, रेखा पाटील आदींनी पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे यांना निवेदन प्रसंगी केले आहे.