भडगाव वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश मेळावा ४ नोव्हेंबरला.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास मा. प्रा. ईश्वर पाटील (जिल्हा अध्यक्ष), अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे (जिल्हा महासचिव व भडगाव तालुका निरीक्षक) तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध पक्षातील कार्यकर्ते व नागरिक वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हा महासचिव अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांनी दिली.
अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे पुढे म्हणाले की, “पाचोरा-भडगाव मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवार दिले जाणार आहेत.”