भरधाव डिझायर गाडीची बैलगाडीला जोरदार धडक; शेतकरी व बैल गंभीर जखमी

0 340

भरधाव डिझायर गाडीची बैलगाडीला जोरदार धडक; शेतकरी व बैल गंभीर जखमी

भडगाव प्रतिनिधी :–

भडगाव–कजगाव रस्त्यावर कोठली फाट्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या डिझायर कारने (क्र. MH 02 BR 1601) बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या धडकेत बैलगाडीचा चक्काचूर झाला असून शेतकरी आणि बैल गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना आज (दि. १८ जुलै) दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. कोठली येथील शेतकरी विजय पाटील शेतीचे काम आटपून बैलगाडीने घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. अपघातात दोन्ही बैलांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून विजय पाटील यांनाही गंभीर इजा झाली आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. बैलांनाही प्राथमिक उपचार घटनास्थळीच देण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!