अंजली हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार
भडगाव प्रतिनिधी :-
अंजली हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात महिलांच्या विविध आरोग्य समस्यांवर सखोल मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात आली.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. दिव्या सोळुंके यांनी शिबिरात आलेल्या असंख्य महिलांची मोफत तपासणी केली व आवश्यक ती वैद्यकीय सल्ला व उपचार दिले. त्यांच्यासह योजना पाटील, करीमा खान, संगिता जाधव आणि सोनाली चौधरी यांनीही उपस्थित महिलांना आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हॉस्पिटलमधील अद्ययावत वैद्यकीय सुविधा महिलांसाठी खुल्या असून, या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित डॉक्टरांनी केले. सर्व महिलांना आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व उपस्थितांचा आभार मानण्यात आला.
या शिबिरासाठी भडगाव डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन, माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता जाधव, शेतकरी संघाच्या संचालिका व माजी नगरसेविका योजना पाटील, अँग्लो हायस्कूलच्या चेअरमन करीमा खान, सोनाली चौधरी, मनिषा पाटील, माऊली फाउंडेशन आणि अंजली हॉस्पिटलचे सहकारी कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले.