दीक्षांत प्रमोद सोनवणे यांची ‘स्वराज्य न्यूज’च्या प्रतिनिधीपदी नियुक्ती
पाचोरा प्रतिनिधी :-
दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांचे सुपुत्र दीक्षांत प्रमोद सोनवणे यांची प्रतिष्ठित डिजिटल माध्यम स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींचे प्रभावी वार्तांकन करणाऱ्या दीक्षांत सोनवणे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या विविध समस्या, यशोगाथा आणि वास्तव घटनांना सातत्याने वाचा फोडली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत स्वराज्य न्यूजकडून त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आता ते स्वराज्य 24 न्यूजच्या माध्यमातून हे कार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.