मतिमंद मुलां-मुलींची निवासी शाळेत वृक्षारोपण
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – तालुक्यातील महाराणा प्रताप नगर (वंजारी) परिसरात असलेल्या परिश्रम मतिमंद मुलां-मुलींची निवासी शाळा व स्व. स्वामीप्रसाद युवा फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. तहसीलदार डाॅ.उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या हस्ते शनिवारी १९ रोजी सकाळी ११:३० वाजता शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.