भडगाव शहरात शासनाच्या जागेवरच शासनाचा आतिक्रमण; नगर परिषदेच्या विकास कामांना अडथळे.?

0 935

भडगाव शहरात शासनाच्या जागेवरच शासनाचा आतिक्रमण; नगर परिषदेच्या विकास कामांना अडथळे.?

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरात सन 2009 मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली, परंतु पंधरा वर्षांनंतरही अपेक्षित विकास घडून आलेला नाही. शहरातील विकासकामांना वेळोवेळी अडथळे येत असून, यामागचे प्रमुख कारण म्हणजे अनेक शासकीय जागा अद्यापही विविध खात्यांच्या ताब्यात असल्यामुळे नगर परिषदेची अंमलबजावणी प्रक्रिया खोळंबली आहे.

शहरातील अनेक महत्त्वाच्या जागा जिल्हा परिषद, पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीत असून, त्यावर नगर परिषदेच्या आवश्यक योजनांसाठी जागा उपलब्ध होत नाही. परिणामी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन केंद्रे, भाजी पाला मार्केट,यांसारखी मूलभूत कामे रखडली आहेत.

विशेष म्हणजे, या काही जागांवर अनधिकृत आतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे विकास आराखडे धुळीला मिळण्याची वेळ आली आहे. परिणामी नागरिकांच्या गरजा अपूर्ण राहतात, आणि जनतेत नाराजी वाढत आहे.

या समस्येच्या निवारणासाठी पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील हे सातत्याने प्रयत्नशील असले तरीही अद्याप प्रश्न सुटलेला नाही. नागरिकांतूनही जोरदार मागणी आहे की, संबंधित शासकीय विभागांनी आपापल्या मालकीच्या जागांची स्पष्टता करून नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या जागा तात्काळ नगर परिषदेच्या ताब्यात द्याव्यात.

भविष्यातील शहर विकास आराखड्याच्या दृष्टीने ही समस्या तातडीने सोडवणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा भडगाव शहर विकासाच्या शर्यतीत मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!