लोकशाही पद्धतीने “माझा मुख्यमंत्री” उपक्रमाचे यशस्वी आयोजन — दहीवद माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.!!!
लोकशाही पद्धतीने “माझा मुख्यमंत्री” उपक्रमाचे यशस्वी आयोजन — दहीवद माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
दहीवद (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयामार्फत “माझा मुख्यमंत्री” या लोकशाही पद्धतीने पार पडणाऱ्या अभिनव व पारदर्शक निवडणूक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शालेय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचे बीज रोवण्याचा व त्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष अनुभव देण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
गोंडगाव माध्यमिक विद्यालय, भडगाव येथून बदलीने आलेले व सर्वांचे लाडके, शिस्तप्रिय, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणारे आदरणीय मुख्याध्यापक श्री. के. जे. वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी एकूण पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच पार पडली. मतदान अधिकारी १, २, ३ ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतः सांभाळली, तर पोलीसांची भूमिका पार पाडण्यासाठी गणवेश परिधान केलेले तीन विद्यार्थी नियुक्त करण्यात आले होते.
मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व आधुनिक करण्यासाठी टॅब व मोबाईलच्या माध्यमातून ई-व्हीएम आधारित सिस्टीम तयार करण्यात आली. त्यात उमेदवारांची नावे व चिन्हे समाविष्ट करून मतदार विद्यार्थ्यांना मतदानाचा अनुभव देण्यात आला. एकूण २२३ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पारदर्शक मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन श्री. वाघ सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या गोंडगाव येथील कार्यकाळात अशा उपक्रमांची अंमलबजावणी न होऊ शकल्याने, दहीवद विद्यालयात त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमासाठी रा. स. शिक्षण प्रसारक मंडळ, चाळीसगाव चे चेअरमन बापूसो विनायक यशवंतराव चव्हाण व सचिव आबासो बी. व्ही. चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
गावाचे सरपंच दादासो पंकजदादा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनीही शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
लोकशाहीची खरी बीजे शाळेतच रोवली जातात, हे “माझा मुख्यमंत्री” या उपक्रमाने पुन्हा सिद्ध केले आहे. — अशी भावना श्री. के. जे. वाघ सर यांनी व्यक्त केली, पत्रकार अशोक परदेशी यांच्याशी संवाद साधताना.
श्री. वाघ सर, तुमच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनास व लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या कार्यास सलाम