पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – तालुक्यातील मोंढाळे प्र.अ.येथे ५४ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.ज्ञानेश्वर हिम्मत पाटील असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी ज्ञानेश्वर हिम्मत पाटील यांनी नैराश्यातून शुक्रवारी (ता.११) दुपारी तीन वाजता आपल्या पिंपळ भैरव शिवारातील शेतात निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.या बाबत राहुल निंबा पाटील यांनी पोलिसांत खबर दिली,त्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सुनिल हाटकर करीत आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.