बैलगाडीतून तोल जाऊन पडल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – शेतातून बैलगाडीने घरी येत असतांना तोल जावून खाली पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला.शिवाजी विठ्ठल पाटील,वय ६८ रा. दगडी सबगव्हाण ता.पारोळा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.ही घटना तीन रोजी घडली.
शिवाजी पाटील हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.तीन जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते शेतातून बैलगाडीने घरी येत असतांना तोल जावून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यांना रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला.याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होऊन पुढील तपास पोहेकॉ कैलास साळुंखे करीत आहे.