करोडपती स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरा.!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित सौ. एम.यु.करोडपती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंगलमय वातावरणात आषाढी एकादशी साजरा करण्यात आली.यानिमित्त संस्थाध्यक्ष यु एच करोडपती यांनी आषाढी एकादशीलाच पंढरपूर का जातात यावर विद्यार्थ्यांना माहिती मार्गदर्शन केले. प्राचार्या स्वाती बलखंडे यांनी संत गोरा कुंभाराची गोष्ट सांगून विठ्ठलाच्या भक्तीची महती स्पष्ट केली.इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल भक्तीवर आधारित नृत्य सादर केले. तद्नंतर विठ्ठल माऊलींची मूर्ती पालखीत विराजमान करून शाळेच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यात विद्यार्थी वारकरी वेशभूषेत टाळ,मृदुंग, झेंडे तसेच तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाले होते.
लेझीम,ढोल गजराने वातावरण पंढरीमय झाले होते.कार्यक्रमात संस्थाध्यक्ष यु.एच.करोडपती,संस्थेच्या संचालिका मंगला करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर, संचालक डॉ.चेतन करोडपती, सदस्या राधिका बडगुजर व प्राजक्ता बडगुजर,प्राचार्या स्वाती बलखंडे व शिक्षक कर्मचारी सहभागी होते.