वारकरी संप्रदायाच्या वारसा जपून विद्यार्थ्यांनी केली आषाढी एकादशी साजरी.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – युनिव्हर्सल स्कूल रन बाय पोदार कन्सल्टन्सी विद्यालयात आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनी साजरा झाली.विद्यार्थी बालकांनी विठ्ठल रुक्मिणी चा वेश परिधान करून सजीव देखावा केला.
बालकांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जपून वेगवेगळ्या वेशभूषेतून नृत्य,अभंग गात पालखी सोहळा पारंपारिक टाळांच्या गजरात शाळेच्या प्रांगणात काढण्यात आला.विठ्ठल रुक्मिणी यांचे औक्षण पूजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.याप्रसंगी शाळेचा अध्यक्षा श्रीमती नेवले, प्राचार्या गायत्री गुजराती, उपप्राचार्या स्मिता मोरे व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.