पारोळा श्रीराम मंदिर संस्थानाला १४ कोटी १६ लाखाचा धनादेश

0 36

पारोळा श्रीराम मंदिर संस्थानाला १४ कोटी १६ लाखाचा धनादेश

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – येथील श्रीराम मंदिर संस्थानाची नॅशनल हायवे ६ वर काही जमिन अधिग्रहीत झालेली होती,त्या जमिनीचा मोबदला यापूर्वीही दिड कोटी मिळाला होता आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधत आज रविवारी ६ रोजी मंदिरात घेतलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अमळनेरचे प्रांताधिकारी नितीन मुंडावरे,मा.खा.ए.टी. पाटील,तहसिलदार डॉ. उल्हास देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते १४ कोटी १६ लाख रुपयांचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल,कल्पेश अग्रवाल, ॲड दत्ता महाजन,डॉ.अनिल गुजराथी यांना प्रदान करण्यात आला.विशेष म्हणजे हा मोबदला मिळवून देण्यासाठी जळगावचे ॲड किशोर पाटील यांनी एक रुपया न घेता अनमोल सहकार्य केले.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मा.खा.ए.टी.पाटील होते तर अमळनेरचे प्रांताधिकारी नितीन मुंडावरे,तहसिलदार डॉ.उल्हास देवरे,माजी नगराध्यक्ष तथा भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख गोविंद शिरोळे,ॲड अतुल मोरे,सीए मुकेश चोरडीया,भाजपा तालुकाध्यक्ष अतुल पवार, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, बालाजी संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब शिंपी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मा.खा.ए.टी.पाटील, प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, गोविद शिरोळे,ॲड अतुल मोरे,सीए मुकेश चोरडीया आदींनी आपापली मनोगत व्यक्त केले.संस्थानने मिळालेल्या या पैशांचा उपयोग मंदिराच्या विकासासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसुविधा व गोरगरीबांच्या कल्याणासाठी करावा असा सल्ला उपस्थितांनी दिला.

प्रास्ताविकात संस्थानाचा सविस्तर लेखाजोखा अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी मांडला.सुत्रसंचालन सुनिल भालेराव यांनी केले.आभार विश्वस्त कल्पेश अग्रवाल यांनी मानले.कार्यक्रमाला शहर तलाठी निशिकांत माने, केशव क्षत्रीय,चंद्रकांत शिंपी,

सचिन गुजराथी,समीर वैद्य, युवराज पाटील,रमेश महाजन,लक्ष्मीकांत भावसार, धीरज महाजन,जितेंद्र चौधरी, संकेत दाणेज,भुषण टिपरे, छोटू पाटील,भावडू राजपूत, भैय्या महाजन,देविदास पाटील,मनोज चौधरी,राहुल निकम,भगवान महाजन, विनोद पाटील आदींसह भाजपा,रा.स्व.संघाच्या कार्यकर्ते रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वितेसाठी प्रकाश पाटील,अरुण भोई,ईश्वर पाटील,डोंगर चौधरी,अमोल वाणी,गोपीचंद चौधरी,अशोक शिंदे,रोशन मराठे,वेदांत ठाकूर,मंदिराचे पुजारी हरीनारायण मिश्रा व श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले.दरम्यान संस्थानाने आषाढी एकादशी निमित्त भाविकांसाठी फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!