गोंडगाव विदयालयात आषाढीची निघाली चिमुकल्यांची वारी.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
रा. स.शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात आषाढी एकादशी निमित्त डीजेच्या संगीतावर व *पांडुरंगाच्या भक्तीगितावर चिमुकल्या विदयार्थ्यांची पायी वारी गावातुन काढण्यात आली. यावेळी विदयार्थ्यांनी सफेद कुर्ता, धोतर, टोपी, कपाळावर टीळा अशी आकर्षक वेषभुषा केलेली होती. हाती भगवे झेंडे, टाळ, मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाचे नामस्मरण करीत ही पायी वारी निघाली.गावात चौका चौकात विदयार्थ्यांनी जनजागृतीपर उत्कृष्ट पथनाटय सादर केले.
यावेळी ठिकठिकाणी प्रतिष्ठीत नागरीक , पालक वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी या पंढरपुरात वाजत गाजत लगीन लागत, देह विठ्ठल विठ्ठल झाला, आली पताका घेऊन वारी, विठ्ठला पांडुरंगा , ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम यासह संगीताच्या तालावर या भक्तीगितांनी परीसर दुमदुमला होता. भक्तीमय वातावरण झालेले दिसुन आले. शेवटी या पायी वारीचा विदयालयात समारोप करण्यात आला. यावेळी विदयार्थ्यांनी संगीताच्या तालावर भक्तीमय गितांनी नाचगाण्याचा रिंगण करीत आनंद घेतला. विदयार्थ्यांनी राजगीर्याचे लाडुचा स्वादही घेतला. याकामी सांस्कृतीक कार्यक्रम प्रमुख श्री.पी. व्हि. सोळंके, श्री. एन. ए. मोरे, श्री. आर. बी. महाले, श्री. एस. डी. चौधरी यांचेसह शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. बापुसो, बी. जी. नन्नावरे, श्री. सी. एस. सोन्नीस, श्री. एस. डी. चौधरी, श्री. आर. एस. देवकर, श्री. व्हि. ए. पाटील, श्री. एस. आर. पाटील, श्री. एस. वाय. पाटील, श्री. पी. व्ही. सोळंके, श्री. बी. डी. बोरसे, श्री. एस. एस. आम्ले, श्री. आर. एस. सैंदाणे, श्री. एस. आर. महाजन, श्री. एन. ए. मोरे, श्री. पी. जे. देशमुख, श्री. एस. जी. भोपे, श्री. ए. एम. परदेशी, श्री. एस. एल. मोरे, श्री. व्हि. एम. जाधव यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरीक, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.