लोण पिराचे येथे मोहरम उत्साहात साजरा.!!!
ऐक्य व श्रद्धेचा संगम
भडगाव ता. प्रतिनिधी :-आमीन पिंजारी
कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या लोण पिराचे येथे मोहरम च्या दिवशी दि.६ रोजी ताजिया मिरवणुक मोठया उस्तवात साजरी करण्यात आली ताजिया मिरवणुक व विसर्जन मध्ये लोणसह परीसरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते हिंदु मुस्लीम बांधवांनी दर्शना साठी गर्दी केल्याने सर्वधर्म समभाग चा प्रत्यय येथे येत होता
हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणुन लोण पिराचे येथील दर्गा प्रसिध्द आहे हिंदु मुस्लीम एकत्र येत येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करतात मोहरम च्या दिवशी दि.६ रोजी ताजिया मिरवणुक काढण्यात आली यात लोण पिराचे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ताजिया या कार्यक्रमासाठी कजगाव, बोदर्डे,कनाशी, बोरनार, घुसर्डी व लोण पिराचे या सर्व गावात हिंदु व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पुर्ण गावात फिरून (खिचडा)अन्न धान्य व रोख स्वरूपात आलेल्या वर्गणीतून (खिचडा मधुन) दर्गाच्या प्रांगणात साबुदाणा खिचडी बनवत महाप्रसादाचे आयोजन येथे करण्यात आले होते प्रसंगी लोण पिराचे पंचक्रोशीतील नागरिक सह गावातील नागरिक जे बाहेर गावी उद्योग व्यवसाय नोकरी निम्मित स्थायिक झाले आहेत ते देखील या महाप्रसाद व ताजिया मिरवणुकीत सहभागी झाले होते ताजिया मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती ताजिया ची गावातून मिरवणुक काढण्यात आली प्रसंगी मिरवणुकी नंतर दर्ग्यावर चादर चढविण्यात आली तेथुन ताजिया घुसर्डी येथे नेण्यात आले तेथील मिरवणुकी नंतर गिरणा नदीत ताजिया चे विसर्जन करण्यात आले प्रसंगी भाविकांनी मोठी गर्दि केली होती चौकट लोण पिराचे येथे चारशे वर्षा पूर्वीचा दर्गा आहे या गावात केवळ पिंजारी समाजाचे एक घर आहे या दर्ग्याची पुजा देखभाल हे सारे पिढ्यानपिढ्या पासुन पाटील परिवार पहात आहे आजहि पाटील परीवार हे दर्ग्याची पुजा अर्चा सह देखभाल करत आहे गावात मुस्लीम समाज नाहि समाज बांधवा सह अठरा पगड जातीच्या ग्रामस्था कडुन ताजिया मिरवणुक व यात्रोत्सव साजरा करण्यात येतो त्यातुन सर्वधर्म समभावाचे दर्शन घडवले जाते गावातील ग्रामस्थांनी मुस्लीम धर्माचा केलेला आदर उल्लेखनीय आहे मोहरम व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने साबुदाणा चा महाप्रसाद मोहरम व ताजिया मिरवणुकी निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन येथे करण्यात येत असते त्या साठी काही गावातून खिचडा मागण्यात येतो आलेल्या अन्न धान्य व रोख रक्कम मधुन भाजी भाकरी चा महाप्रसाद बनविण्याची जुनी परंपरा आहे मात्र या वर्षी आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी आल्याने साबुदाणा खिचडी चा महाप्रसाद बनविण्यात आला होता.