लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर व श्री पांडुरंग देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भव्य बाल वारकरी दिंडीचे आयोजन.!!!

0 30

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर व श्री पांडुरंग देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त भव्य बाल वारकरी दिंडीचे आयोजन.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे बाल वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रतीक चव्हाण याने विठ्ठलाची सुरेख भूमिका साकारली तर फाल्गुनी देशपांडे या विद्यार्थिनीने रुक्मिणीची भूमिका साकारली. अश्वारूढ विठ्ठल रुक्मिणीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या. त्यामध्ये वेदांत ठाकरे संत तुकाराम, अर्णव परदेशी संत एकनाथ महाराज, ओम तिवारी स्वामी विवेकानंद, मनस्वी शिसोदे संत मुक्ताबाई, पूर्वा वाघ संत कान्होपात्रा, मीनल बोरसे व सानवी शिंदे संत मीराबाई, अर्णव भदाणे संत ज्ञानेश्वर, तुषार गांगुर्डे संत तुकडोजी महाराज या संतांच्या वेशभूषा साकारल्या. तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय वारकऱ्यांची भूमिका साकारली. कपाळी टिळा, गळ्यात माळा,मुखी विठ्ठलाचे नामस्मरण, विठ्ठल भक्तीने संपूर्ण परिसर निनादला. सजवलेल्या ट्रॅक्टर वर संत विराजमान झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले. वारी आपल्या आयुष्यात समता एकात्मता व बंधुता जोपासण्याचा संदेश देते.लाडकुबाई वाडा, महादेव गल्ली,खोल गल्ली, जागृती चौक, बालाजी चौक,दत्त मढी चौक,शनी चौक,आझाद चौक या मार्गाने वारकरी दिंडीचे प्रस्थान झाले. वारकरी दिंडीच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.श्री पांडुरंग देवस्थान श्रीमती लाडकुबाई देशपांडे ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजय देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. चोख पोलीस बंदोबस्तात बाल वारकरी दिंडी संपन्न झाली.शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!