खलिल शेख भुरू यांना पदोन्नती — पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी :-
खलिल शेख भुरू (रा. जळगाव) यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली आहे. आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवा व उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत प्रशासनाने त्यांना ही पदोन्नती बहाल केली आहे.
खलिल शेख हे गेल्या काही वर्षांपासून पोलीस विभागात कार्यरत असून, त्यांनी विविध ठिकाणी आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या कामगिरीचे अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. PSI पदावर निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जळगाव पोलिस दलात त्यांची ही पदोन्नती प्रेरणादायी ठरणार असून, त्यांनी जनतेच्या सेवेत अधिक जोमाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.