रुग्णालय व मूकबधिर शाळेत फळवाटप करून राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष रविंद्र अहिरे यांचा वाढदिवस साजरा.!!!
रुग्णालय व मूकबधिर शाळेत फळवाटप करून राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष रविंद्र अहिरे यांचा वाढदिवस साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष रविंद्र अहिरे यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम राबवत साजरा केला. या निमित्ताने भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना तसेच साई समर्थ मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले.
या उपक्रमात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मुंढे, कर्मचारीवर्ग तसेच मूकबधिर शाळेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, माजी नगरसेविका व शेतकरी संघ संचालिका योजना पाटील, उपाध्यक्ष मधुकर वाघ, शहराध्यक्ष सुधीर अहिरे, दिलीप वाघ, निवृत्त प्राचार्य डी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रविंद्र अहिरे यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले व त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे अधीक्षक किशोर पाटील, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. विनोद भामरे, शिक्षिका अश्विनी पाटील, उमेश जाधव, सुनिल पाटील, जितेंद्र पाटील, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार संघाचे युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सहकार्य केले.
रविंद्र अहिरे हे दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करून एक सकारात्मक उदाहरण समाजासमोर ठेवतात.