कजगाव ग्रामपंचायतीत २.२० लाख खर्चात अनियमितता; सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार – गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल.!!!

0 47

कजगाव ग्रामपंचायतीत २.२० लाख खर्चात अनियमितता; सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार – गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कजगाव (ता. भडगाव) येथील ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या खर्चामध्ये रु. २,२०,००० इतक्या रकमेच्या वापरात गंभीर अनियमितता झाल्याचे उघडकीस आले आहे. कजगाव येथील रामकृष्ण शिवाजी बोरसे (अण्णा बोरसे) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

गटविकास अधिकारी, भडगाव यांनी केलेल्या चौकशीत सरपंच रघुनाथ महाजन आणि ग्रामसेवक नारायण शिवराम महाजन हे प्रथमदर्शनी जबाबदार आढळून आले असून, सदर प्रकरणाचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.), जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

कोणती अनियमितता झाली.?

तक्रारदार रामकृष्ण बोरसे यांनी ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन वर्ग झालेल्या रकमा व कॅशबुकची पडताळणी केली असता खालील बाबी उघड झाल्या:

मच्छिंद्र हिलाल मोरे यांच्या नावावर १५ व्या वित्त आयोगातून चार वेळा खालीलप्रमाणे रकमा वर्ग करण्यात आल्या:

२८ जानेवारी २०२४ – ₹९०,०००

२३ मार्च २०२४ – ₹९०,०००

३ जून २०२४ – ₹९०,०००

५ जुलै २०२४ – ₹४०,०००

सदर रक्कम साफसफाई व स्वच्छतेसाठी मजुर उपलब्ध नसल्यामुळे मोरे यांना दिल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे. मासिक सभेचा ठराव, कृती आराखड्याचा आधार व ग्रामसभेच्या नोंदींचा दाखला दिला आहे.

मात्र, या खर्चासाठी कोणतीही तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश, निविदा प्रक्रिया यासारखी कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.

खर्च जेसीबी भाडे, साहित्य खरेदी, पाणीपुरवठा साहित्य या नावाखाली दर्शविण्यात आला असला तरी कॅशबुक, व्हाउचर आणि ई-ग्रामस्वराजवरील खर्च नोंदीत कोणताही ताळमेळ नाही.

पुढील कारवाईची मागणी

तक्रारदार रामकृष्ण बोरसे यांनी सांगितले की,

> “मी वेळोवेळी सदर अनियमित खर्चाबाबत तक्रारी केल्या. आता गटविकास अधिकाऱ्यांनी अनियमितता झाल्याचे स्पष्ट करत अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे. मी न्यायालयात जाऊन कठोर शिक्षा होईपर्यंत लढा सुरू ठेवणार आहे. तसेच,

ग्रामसेवकांना त्वरित निलंबित करावे,

सरपंच यांच्यावर कलम ३९(१) नुसार अपात्रतेची कारवाई करावी,

व अपहार झालेली रक्कम त्वरित वसूल करावी.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!