राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५१ वी जयंती कृषी दुतांनी केली उत्साहात साजरी.!!!
ऐनपूर (ता. रावेर), दि. २६: लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात कृषी दुतांच्या वतीने जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. पूजन प्राचार्य श्री अक्षय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्यामुळे शिक्षणाचे महत्व वाढले आहे. त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अनेक क्रांतिकारी प्रयोग करून बहुजन समाजासाठी नवे मार्ग खुले केले. शिक्षण हेच खरी समतेची साधना आहे, हे ओळखून त्यांनी अपमान आणि विरोध सहन करत समाजउद्धाराचे कार्य केले. आज शिक्षण प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचले आहे, यामागे प्रेरणा म्हणजेच शाहू महाराज आहेत.”
कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षिका जयश्री सराफ, मानता महाजन आणि इतर कर्मचाऱ्यांनी केले. यावेळी कृषी दूत गौरव महालकर, सौरव महेर, पीयूष नेहते, कुणाल सपकाळे आणि पुष्पराज शेळके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
कृषीदुतांना प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी. एम. गोणशेटवाढ सर व प्रा. व्हि . एस. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.