म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी.!!!
भुसावळ प्रतिनिधी :-
भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी.मेढे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी क्रीडा शिक्षक बी. एन. पाटील होते. प्रसंगी शाळेचा सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, डॉ. प्रदीप साखरे, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी,
विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी.एन.पाटील यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली. व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी शाळेच्या सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे मॅडम, यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी सखोल माहिती दिली, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक डॉ. प्रदीप साखरे , यांनी राजर्षी शाहू महाराज हे कसे आदर्श राजे होते हे पटवून दिले . त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक एस. टी .चौधरी सर यांनी विविध उदाहरणांद्वारे शाहू महाराजांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक एस. जी . मेढे.यांनी अध्यक्षीय भाषणाच्या स्वरूपात लोकराजा राजर्षी शाहू महाराजां विषयी सांगताना, ” राजर्षी शाहू महाराज हे एक खरेखुरे क्रांतिकारक होते, अठराव्या शतकात ज्या वेळेला समाजात स्पृश अस्पृश्य असा भेदभाव होता
त्यावर जनक्रांती करून वाचा फोडणारे एक समाज क्रांतिकारक होते. त्यांनी केवळ विचारांनी नाही तर स्वतःच्या आचरणातून समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला समाजातील असंख्य स्तरातून त्यांच्यावर टीका सुद्धा केली गेली परंतु ते निर्भीड असल्यामुळे ते मुळीच डगमगले नाही संपूर्ण समाजाचा व त्या काळच्या कर्मठ लोकांचा रोज पत्करून ते निर्भीडपणे कार्य करीत राहिले. त्यांच्या राज्यात म्हणजे कोल्हापूर संस्थानात त्यांनी असंख्य लोकोपयोगी कामे केली, हुंडाबंदी, सतीची चाल नष्ट करून घटस्फोटाचा कायदा काढला, कुलकर्णी पद्धत नष्ट करून त्यांनी तलाठ्यांची नेमणूक केली, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून जागोजागी वस्तीगृहे, जागोजागी शाळा काढल्या, गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली,
आणि समाजातील जातीयता नष्ट व्हावी म्हणून ते स्वतः दलित लोकांच्या घरी लग्नाला जात असत व त्यांच्या पंक्तीत भोजन करीत असत, कोल्हापूरच्या एका दलित कांबळे नावाच्या व्यक्तीला त्यांनी चहाचे दुकान उभारून दिले होते व दररोज सकाळी जाऊन त्याच्या चहाच्या दुकानात ते स्वतः चहा पीत असत म्हणजे केवळ विचारातून नाही तर आपल्या आचरणातून त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी शिक्षण सक्तीचे केले व ज्या घरातील शिकणारे मुल शाळेत जात नसेल त्याला दंड म्हणून एक रुपया त्यांनी ठेवला व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब यांना शिक्षण घेत असताना असंख्य मदत केली. माणगावला जेवलास पुरुषांची एक सभा भरली आणि त्यावेळेला राजर्षी शाहू महाराज यांना अध्यक्ष स्थान देण्यात आले त्या वेळेला जनतेला संबोधताना ते म्हणाले की, ” तुम्हाला तुमचा लोककल्याणकारी नेता मिळालेला आहे . हा नेता केवळ तुमचाच उद्धार करणार नाही तर अखिल भारताला मानव मुक्तीचा मंत्र देईल असे त्यांनी भाकीत केले होते व ते खरे ठरले होते. शाळेतील डी. के. भंगाळे ,
एन बी पाटील, संध्या धांडे, रेखा सोनवणे, शालिनी बनसोडे, प्रवीण चौधरी, पुनम देवकर, मंदा मोरे, लक्ष्मण पवार,अरुण नेटके, राजू बागुल आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रयत्न केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप शाळेचे शिक्षक श्री एन एच राठोड यांनी केले..