उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नती अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती भडगाव अंतर्गत संपन्न.!!!

0 124

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नती अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती भडगाव अंतर्गत संपन्न.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी : आमिन पिंजारी

कजगाव ता.भडगाव ; येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमंग महिला प्रभाग संघ वार्षिक सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची उपस्थितीती होती

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून संत सावता महाराज मंगलकार्यालयात कजगाव वाडे गट जिल्हा परिषद प्रभाग सर्व साधारण सभेत महिला बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आमदार किशोर पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मार्गदर्शन केले आमदार किशोर पाटील यांनी व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी बचत गटांना यशस्वितेसाठी कानमंत्र दिला तर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल महिला बचत गटाचे कौतुक करून त्यांना विविध मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाच्या परिसरात बोदर्डे येथून मसाला, गुढे येथून हळद, पावडर, निंबु, लोणचे, पाथराड येथून कुरडई, पापड तसेच महिलांनी विविध साहित्य विक्रीचे स्टॉल लावले होते यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्या कडून पस्तीस बचत गटांना दीड कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले,सामाजिकतेचे भान ठेवून गरजू महिलांना जीवन आवश्यक वस्तू व किराणा वाटप बचत गटांच्या माध्यमातून करण्यात आले त्यांचे देखील आमदारांनी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी कौतुक केले

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चे प्रकल्प संचालक राजू लोखंडे,गट विकास अधिकारी के.बी.अंजने, जिल्हा अभियान व्यवस्थापक,हरेश्वर भोई,सरपंच रघुनाथ महाजन,यांच्या सह राजकीय,सामाजिक क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वितेसाठी उमेद चे तालुका व्यवस्थापक प्रशांत महाले,पवन राठोड,सचिन महाजन,यांच्या सह उमेद अभियानातील कॅडर व असंख्य महिला बचत गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!