शहराच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या उभारणी सह विविध समस्यांचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे निवेदन.!!!
भडगांव प्रतिनिधी :
भडगांव शहराचा गाव दरवाजा असलेले मुख्य प्रवेशद्वार (नगरदेवळा दरवाजा) सुस्थितीत असतांना पाडण्यात आला. या मुख्यप्रवेशद्वाराचे हनुमानमंदिराजवळ नव्याने उंची देत बांधकाम करा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करा. अशी मागणी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी मार्गदर्शनात माजी नगरसेविका योजना पाटील, माजी गटनेते शंकर मारवाड़ी, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, जिल्हा युवाधिकारी माधव जगताप, ता. युवाध्यक्ष चेतन पाटील,
शहर संघटक जिभाऊ महाजन, उपाध्यक्ष भैय्या राजपूत, शहराध्यक्षा मनिषा पाटील, शहर युवाध्यक्ष चेतन पाटील, युवक संघटक रोनित अहिरे, उपाध्यक्ष यश पाटील,
युवा संघटक यश महाजन, करण राजपूत, समन्वयक भुषण देवरे, सह समन्वयक सत्यजित पाटील, जेष्ठ नगरिक पंडित पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील यांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांचे मार्गदर्शनात आस्थापना विभाग प्रमुख राहुल साळुंखे यांचेकड़े निवेदनाद्वारे केली आहे. या सोबतच स्वछता व पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण अभियान राबविणे,
जूना पारोळा रोड पूनम हॉटेल ते सुर्यवंशी डेअरी व नाचनखेड़ा रोड न. प. हद्दीपर्यन्त दुरुस्ती, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, करणे, संडास साफ सफाई टँकर दुरुस्ती करणे, शुद्ध पाणी पुरवठा सह नविन पाइप लाइन टाकतांना तुटलेले ढापे व खड्डे भरणे, रोगप्रतिबंध फवारणी करणे आदी मुलभुत समस्या सोडवा असेही निवेदनात नमूद केले आहे.