पत्रकारांवरील खोट्या गुन्ह्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जळगावात ‘आक्रोश मोर्चा.!!!
पत्रकारांवरील खोट्या गुन्ह्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जळगावात ‘आक्रोश मोर्चा.!!!
जळगाव प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा शाखेने पत्रकार संघांचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, राकेश सुतार,कुंदन बेलदार यांच्या वर पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी स्थानिक गुंड प्रवृतीच्या व्यक्तीचे एकूण दाखल केलेल्या खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेऊन त्या गुंड प्रवृतीच्या व्यक्तीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून हद्दपार करावे व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबीत करावे म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित राहून आक्रोश मोर्चा काढला.
सविस्तर वृत्त की,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता संविधानाने मान्यता दिली आहे. समाजातील अनेक अनिष्ट घडामोडी पत्रकार निडरपणे मांडत असतात. एव्हढेच नव्हे तर समाजमनाचा आरसा म्हणून लोक मान्यता पावलेला पत्रकार आहे.मात्र सध्या सत्य शोधकी,निडर व निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून हा लोकशाहीच्या चौथा खांबाला नेस्तनाभूत करण्याचा खटाटोप पाचोरा येथे करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, तसेच संघटनेचे पदाधिकारी असलेले राकेश सुतार, कुंदन बेलदार यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे वरील पदाधिकारी / पत्रकार यांनी पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे विरोधात बातम्यांचे सत्र सुरू केले होते. या बातम्यां मुळे पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे बंद पाडण्यास पोलीस प्रशासनाला भाग पाडले. म्हणून अवैध धंद्यांचा आका असलेला भोला उर्फ शेखर पाटील याने आपला धंदा बंद पडल्याच्या रागातून व पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांनी आपले हप्ते बंद झाल्याच्या रागातून दोघांनी संगनमत करून श्री किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, राकेश सुतार व कुंदन बेलदार आदी पत्रकार बांधवावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई जिल्हा शाखेने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या द्वारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन सदर खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा व पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबीत करावे व गुन्हेगारी प्रवृत्ती च्या भोला उर्फ शेखर पाटील याच्या वर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करून हद्दपार करावे व यापुढे चौकशी केल्याशिवाय पत्रकारांवर खंडणी सारखे गुन्हे दाखल करू नये,अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य भर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल. असे झाल्यास आपल्या सरकारची प्रतिमा मालिन होण्याची दाट शक्यता असल्याने आपण वैयक्तिक लक्ष घालून खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे,अश्या आशयाच्या मागण्या निवेदनात केल्या आहे.
दरम्यान सदर आशयाचे निवेदन जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांना देखील देऊन सदर गुन्ह्याची योग्य चौकशी करून सदरचा गुन्हा तात्काळ निकाली काढावा व खोटे गुन्हे दाखल करून घेणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबीत करून गुन्हेगारी पारश्वभूमी असलेल्या गुंड प्रवृत्ती च्या भोला उर्फ शेखर पाटील याच्यावरील दाखल गुन्ह्यांची दखल घेऊन त्याच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करावी आणि जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायदा सक्तीचा राबविण्यात यावा, अश्या मागण्या करण्यात आल्या.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य अबरार मिर्झा, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे, नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ समाधान मैराळे, प्रिंट मीडिया नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र राजपूत, जिल्हा अध्यक्ष सुनिल भोळे, इलेक्ट्रॉनिक जिल्हाध्यक्ष अय्याज मोहसीन, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, विभागीय संघटक विनोद कोळी, महिला जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री पाटील,महेंद्र सूर्यवंशी, गफ्फार मलिक,आर.डी. चौधरी,सागर शेलार, नुरोद्दीन मुल्लाजी, शैलेंद्र पांडे, प्रल्हाद पवार, मुजम्मील शेख, सुनील कोळी, सुरेंद्र जैन,छोटू सोनवणे,यदुवीर पाटील, नूर खान, गणेश चव्हाण, आत्माराम अहिरे, प्रविण बैसाणे.
चौकट.
मोर्च्यात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बहुसंख्य महिला पत्रकार सह पत्रकार बांधवांनी पोलीस निरीक्षक अशोक पवार व गुंड प्रवृतीच्या भोला उर्फ शेखर पाटीलच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दनाणून सोडले होते.
घोषणा.
खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक पवार याचे करायचे काय – खाली डोके वरती पाय.गुंड प्रवृतीच्या भोला उर्फ शेखर पाटील वर मोक्का लावलाच पाहिजे.असे घोषणा देण्यात आले