धरणगावात उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न.!!!

0 39

धरणगावात उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न.!!!

धरणगाव प्रतिनिधी :–

धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक २० जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नारळ फोडून व पूजा करून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार मंगेश चव्हाण, राजू भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजप नेते डी. जी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तसेच इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमास बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुभाष राऊत, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, विधानसभा क्षेत्रातील प्रमुख संजय पाटील, ठेकेदार वर्धमान भंडारी, देविदास पाटील, विलास महाजन, पप्पू भावे, आणि स्थानिक नगरसेवक तसेच जनप्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणगावकर जनतेसाठी आरोग्य सेवा अधिक सक्षम व सुसज्ज होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी ही ऐतिहासिक पावती ठरणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!