राही मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप उपक्रम उत्साहात संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :–
राही मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने भडगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसारखे आवश्यक साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश आलम, उपाध्यक्ष अबरार मिर्झा, सचिव मुजम्मील शेख, खजिनदार जमाल कासार, इतर पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक नाजीम सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.
“शिक्षणात कोणतीही अडचण येऊ न देता प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक साहित्य मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे,” असे फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले.
शाळेतील शिक्षक आणि पालकांनी फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.