भडगांव नगरपरिषदेने वाढीव कर आकारणी रद्द करावी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी
भडगांव प्रतिनिधी :-
भडगांव नगरपरिषदेकडून नागरिकांना वाढीव कर आकारणी संदर्भात नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे. अशा अनेक तक्रारी जनतेकडून येत असून या करवाढीस जनतेचा विरोध आहे. शहरवासियांना पुरेशा मूलभूत सुविधा नसतांना ही करवाढ अन्यायकारक आहे.
याबाबत नगरपरिषदेने योग्य तो खुलासा करावा. आणि ही अवाजवी करवाढ रद्द करावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन छेडेल. असा इशारा पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाने नगरिषद कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे माजी नगरसेविका योजना पाटील, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, ता. प्रमुख चेतन पाटील, शहराध्यक्ष मनिषा पाटील, युवाधिकारी भैय्या राजपूत, युवासेना प्रमुख रोनित अहिरे, सन्वयक भूषण देवरे, उपप्रमुख सत्यजित पाटील, दत्तात्रय पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिला आहे.