लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे प्रवेशोत्सव साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. रंगीबेरंगी फुलांची आकर्षक कमान, नवे पाठ्यपुस्तक, नवा ड्रेस, सुंदर पुष्पगुच्छ, आज माझा शाळेचा पहिला दिवस असा मजकूर असणारी सुरेख फोटो फ्रेम अत्यंत उत्साही वातावरणात शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे,
उपस्थित प्रतिष्ठित पालक मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेच्या पहिला दिवसाचा उत्साह दिसत होता. पुष्पगुच्छ देऊन तसेच औक्षण करून विद्यार्थ्यांचे लाडकुबाई शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. मध्यान भोजन अंतर्गत विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. शाळेचा परिसर बालकांच्या किलबिलाटाने प्रसन्न झाला. सदर प्रसंगी शाळेतील श्रीमती संगीता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, श्री अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील,सचिन पाटील, हरिचंद्र पाटील, किरण पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.