आ. अमोलदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश एरंडोल आगाराला ५ नवीन एसटी बसेस.!!!
एरंडोल प्रतिनिधी :–
एरंडोल एसटी आगाराला आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या पुढाकारातून ५ नवीन बसगाड्या मिळाल्या आहेत. बीएस-६ तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या अशोक लेलँड बनावटीच्या बसेस गुरुवारी रात्री एरंडोलला रवाना झाल्या आणि शुक्रवारी पहाटे आगारात दाखल झाल्या.
या बसेसच्या लोकार्पण समारंभाचे उद्घाटन आ. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शालिकभाऊ गायकवाड, आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे, सुदामतात्या राक्षे, किरणदादा पाटील, कमलेश पाटील, चिंतामण पाटील, अतुल मराठे, बाळासाहेब पाटील, मुकुंदा पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
बसेस मिळण्यासाठी आ. पाटील यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल व पारोळा तालुक्यात या बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे.
आगामी योजना म्हणून:
एरंडोल आगाराचे नुतनीकरण,
पारोळा बसस्थानकाला आगाराचा दर्जा,
कासोदा येथे नविन बसस्थानका साठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आ. अमोलदादा पाटील यांनी दिली.