मुलांनी केला आईचा भव्यदिव्य अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा साजरा.!!!
मुलांनी आईसाठी आयोजित केला भव्यदिव्य असा ऋणानुबंध अमृत महोत्सवी सन्मान सोहळा वृद्धाश्रमांची संख्या वाढत असताना आधुनिक श्रावण बाळाने साजरा केला आईचा ऋणानुबंध सन्मान सोहळा
मुलांनी केला आईचा भव्यदिव्य अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
मुलांनी आईसाठी आयोजित केला भव्यदिव्य असा ऋणानुबंध अमृत महोत्सवी सन्मान सोहळा
वृद्धाश्रमांची संख्या वाढत असताना आधुनिक श्रावण बाळाने साजरा केला आईचा ऋणानुबंध सन्मान सोहळा
भडगाव येथे नुकताच श्रीमती निर्मला भगवंतराव देशमुख यांचा ७५ वा. अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा भव्यदिव्य अशा स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्ये असे की एका मुलाने आपल्या आईच्या प्रति असणाऱ्या भावना, संवेदना, आईचे परिश्रम, ऋणातून उतराई होण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न होय. भडगाव येथे पहिल्यांदाच असा आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण आईला सन्मान देणारा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आदित्य लॉन्स येथे सदर सोहळा संपन्न झाला.
भडगाव येथील उपक्रमशील, आदर्श प्राथमिक शिक्षक, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष तथा स्वराज्य गट (पॅनल प्रमुख)ग स सोसायटी जळगाव श्री.गणेश भगवंतराव देशमुख आणि श्री प्रशांत भगवंतराव देशमुख यांच्या त्या आई आहेत.
सध्याच्या काळात आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे. कुटुंब व्यवस्था उध्वस्त झालेली आहे. अशा युगात कोणीतरी मुल आपल्या आईसाठी भव्यदिव्य असा सन्मान सोहळा आयोजित करतो. आईप्रति ऋण व्यक्त करतो ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
अत्यंत भावनिक वातावरणात सदर सोहळा संपन्न झाला. आईचे चरण स्पर्श, औक्षण सोहळा, भव्य दिव्य सत्कार समारंभ, आई प्रति मनमोकळेपणाने व्यक्त होणारे जिवलग स्नेहमंडळी, आई विषयीचा माहितीपट सदर कार्यक्रमात दाखवण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी श्री.प्रशांत भगवंतराव देशमुख, सौ.अर्चना दीपकराव देशमुख,श्री.दिपकराव लडकुजी देशमुख तसेच श्री. नानासाहेब बबनराव देशमुख माजी संचालक jddc बँक,श्री सुनील देशमुख माजी नगराध्यक्ष तसेच आप्तेष्ट,मित्र परिवार जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना अध्यक्ष प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.