महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या विदर्भ समन्वयकपदी नरेश गेडाम
पारोळा प्रतिनिधी:-
पारोळा – मुळचे मोर्शी जि. अमरावती व सध्या नागपूर येथील नरेश पांडुरंग गेडाम- पाटील यांची विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनिल देवरे यांनी सोमवारी दिले.
नरेश गेडाम हे सेवानिवृत्त शिक्षण स्थापत्य अभियंता असुन त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास,हितासाठी महाराष्ट्रभर काम केले आहे.
फळशेती,फुलशेती,तसेच शेती यांत्रिकीकरण,शेती उत्पादकता,पणन विपणन याचा गेडाम यांना सखोल अभ्यास आहे.शेतकऱ्यांचे हित,न्याय व हक्कासाठी, विविध समस्या अडीअडचणी सोडवून शासनाचा योजनांचा लाभ मिळणे कामी तसेच संघटनेचे बळकटीकरण,ध्येय धोरणे व विचार,सर्वसामान्य शेतकरी वर्गापर्यंत पोहचविण्याचा उद्दिष्टाने नरेश गेडाम यांची विदर्भ समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली.या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास,हित हेच ध्येय असुन त्यांचा अडीअडचणी न्यायासाठी कटिबध्द असल्याचे गेडाम यांनी यावेळी सांगितले.