टायगर स्कूलच्या यश महाजनला राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत रौप्यपदक
पारोळा प्रतिनिधी:-
पारोळा – नाशिक येथील अधिकृत मान्यता प्राप्त रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे गेल्या ७ जून ला राज्यस्तरीय १३ व्या महाराष्ट्र डे ओपन रोलर स्केटिंग स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या स्पर्धेत पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यश जितेंद्र महाजन याने उज्वल यश संपादन करत रौप्यपदक पटकावले.स्पर्धेत विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.८ ते १० वयोगटातील इनलाइन स्केटिंग प्रकारात यशने उत्कृष्ट कौशल्य,चिकाटी समर्पणाच्या जोरावर दुसरे स्थान पटकावले.यशचा या कामगिरीमुळे शाळेसह पालकांचे नाव उज्वल झाले आहे.टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रविंद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील, प्राचार्य पि.एस.पाटील,
अजीम शेख,उपप्राचार्य कविता सूर्यवंशी,विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर यांचे सह शिक्षक कर्मचाऱ्यांनी यशचे अभिनंदन कौतुक केले.