काळखेडे येथे सत्संगाचा कार्यक्रम. लंगराचा कार्यक्रम.!!!
जामनेर प्रतिनिधी :-
तालुक्यातील काळखेडे येथे दि. ६ रोजी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता सत्संगाचा कार्यक्रम उत्साहात अन भक्तीभावात पार पडला. या कार्यक्रमात महात्मा बंडुजी पाचोरा यांनी उपस्थितीत संगतला सदगुरु संदेश प्रसारीत केला. लंगर प्रसादीचा कार्यक्रम विजयजी पारधी यांनी केले. हा कार्यक्रम काळखेडे गावात भरतजी महात्मा यांच्या घरासमोर हा सत्संगाचा कार्यक्रम झाला. यावेळी विचारामधुन डांभुर्णी येथील गोकुळ परदेशी महात्मा, गोपाल महात्मा, प्रकाश महात्मा पाचोरा, ठाकरे महात्मा, विजयजी मुख्य महात्मा बेटावद, विठ्ठल महाराज शेंदुर्णी, पुष्पा परदेशी बहीणजी पिंपळगाव बुद्रुक, सृष्टी शेले बहीणजी काळखेडे, सानधा कोळी बहीणजी काळखेडे, भरत परदेशी महात्मा, धनराज चव्हाण महात्मा काळखेडे यांनी गित व विचार मांडले. कार्यक्रमाचे सुञसंचलन अरविंद परदेशी महात्मा काळखेडे यांनी केले.या कार्यक्रमाला काळखेडे, राजनी, बेटावद, सोनारी, पिंपळगाव बुद्रुक, डांभुर्णी, कापुसवाडी आदि गावातील नागरीक, महिला भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.