वडधेचे प्रेम संजय देवरे याला राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत कांस्यपदक
भडगाव प्रतिनिधी :-
वडधे (ता. भडगाव) येथील खेळाडू प्रेम संजय देवरे याने नांदेड येथे पार पडलेल्या 23व्या राज्यस्तरीय सिनियर महिला व पुरुष वुशू अजिंक्यपद स्पर्धेत उत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकावले
ही स्पर्धा नांदेडमधील जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम येथे संपन्न झाली. उद्घाटन नांदेड जिल्हा वुशू असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव एस. एस. कटके, नांदेड जिल्हा सचिव राजेश जांभळे आणि डॉ. प्रमोद वाघमारे उपस्थित होते.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या स्पर्धकांमध्ये वडधे येथील प्रेम देवरेने उल्लेखनीय प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. या यशामुळे त्याला क्रीडा विभागातील शासकीय नोकरीसाठी आवश्यक असलेले 5% क्रीडा आरक्षणही मिळणार आहे. या यशाबद्दल प्रेम देवरेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.