भडगाव येथील माहेरवाशीणी शारदा बागुल यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ ६ जून रोजी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा.!!!
भडगाव येथील माहेरवाशीणी शारदा बागुल यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ ६ जून रोजी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील माहेरवाशीण स्व. शारदा बागुल यांची तिच्या पती व इतर सहकाऱ्यांनी निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ भडगाव शहरातील सर्व समाजमंडळे, संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने एकत्र येत दि. ६ जून २०२५ रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर दि. ३ जून रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह भडगाव येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध संघटना, समाजमंडळे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला स्व. शारदा बागुल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले. मोर्चा दि. ६ जून रोजी सकाळी ९ वाजता भडगाव नगरपरिषद कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून शारदा बागुल यांना न्याय मिळावा, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
बैठकीस उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, प्रशांत पवार, बाजार समिती संचालक लखीचंद पाटील, माजी नगरसेवक अमोल पाटील, शिवसेना माजी शहराध्यक्ष मनोहर चौधरी, सचिन चोरडिया, जगन भोई, संतोष भोई, योजना पाटील, पत्रकार नरेंद्र पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, विजय भोसले, जाकीर कुरेशी, डि. डि. पाटील, भाजप मंडळाध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रमेश शिरसाठ, महेंद्र ततार, निलेश पाटील, आकाश कंखरे, सुतार समाज अध्यक्ष विठोबा वाडेकर, चौधरी समाज अध्यक्ष नाना चौधरी, लाडशाखीय वाणी समाज अध्यक्ष प्रवीण येवले, बबलू कोतकर, नाभिक समाज अध्यक्ष संजय पवार, माळी पंचमंडळ अध्यक्ष मुकुंद महाजन, भिकन महाजन, विनोद महाजन, पत्रकार नितीन महाजन, किरण शिंपी, कुणाल पाटील, विकास महाजन, सागर महाजन, मुकेश महाजन आणि इतर नागरिक उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार नरेंद्र पाटील यांनी केले.