वटपोर्णिमेला लाडकीला खुशखबर मिळणार; मे-जूनचे ₹३००० एकत्र येणार.?

0 48

वटपोर्णिमेला लाडकीला खुशखबर मिळणार; मे-जूनचे ₹३००० एकत्र येणार.?

मुंबई :-

मे महिना संपला तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मे महिन्याच्या हप्त्याची अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

त्यामुळे आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु हा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित वटपोर्णिमेच्या दिवशी सरकार लाडक्या बहि‍णींना खूशखबर देण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत खात्यात जमा होणार १५०० रुपये

लाडकींना वटपोर्णिमेला खुशखबर मिळणार

१० जून रोजी वटपोर्णिमा आहे. वटपोर्णिमा हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो. दर महिन्यात कोणत्याही सणाचा मूहूर्त साधत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. त्यामुळे जून महिन्यातदेखील वटपोर्णिमेच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

एकत्र ३००० रुपये येणार.?

लाडकी बहीण योजनेत मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित ३००० रुपये एकत्र येऊ शकतात किंवा मे आणि जूनचा हप्ता वेगवेगळ्या दिवशीदेखील दिला जाऊ शकतो. परंतु जून महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार हे नक्की असल्याचे सांगितले आहे.

 

लाडकीनं केली लाडकीची फसवणूक; बोगस लाडकींकडून वसुली होणार?

लाडक्या बहिणींचा पुन्हा पडताळणी होणार

 

लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केला असल्याचे समोर आले आहे. या महिलांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहे. त्यातील काही महिला या सरकारी कर्मचारीदेखील आहेत. अडीच हजारांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या महिलांना आता योजनेतून बाद केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!